Pune: दत्तवाडीत खुनाचा थरार; गोळ्या झाडून, कोयत्याने वार करून तरुणाचा खून

Pune: Thrill of murder in Dattawadi; Murder of a youth by firing bullets and stabbing मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या एका तरुणाचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज- पुण्याच्या दत्तवाडी परिसरात रविवारी (दि.12) रात्री खुनाचा थरार पाहायला मिळाला. मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या एका तरुणाचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. अमित मिलिंद सरोदे (वय 21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहू वसाहतीसमोर अमित सरोदे हा रविवारी रात्री मित्रांसोबत थांबला होता. त्याच दरम्यान या ठिकाणी आलेल्या संशयित आरोपींनी हल्ला केला आणि इतर दोघांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमितचा जागीच मृत्यू झाला.

दत्तवाडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता रक्ताच्या थारोळ्यात अमितचा मृतदेह पडला होता. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.