BNR-HDR-TOP-Mobile

Pune : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या पुण्यात तिळगुळ समारंभ

0

एमपीसी न्यूज – ”केशरी रंगाचा नवा हिंदुस्थान..तिळगुळा संगे वाढवू महाराष्ट्र धर्माची शान!” बुधवारी (दि. 15 जानेवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या उत्साहात तिळगुळ समारंभाचे आयोजन करून मकर संक्रांतीचा सण साजरा करणार आहे. पुणे शहर मनसे पक्ष कार्यालयाजवळ संध्याकाळी 5.00 वाजता हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

पुणे शहरातील मनसेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणावर तिळगुळ समारंभात सहभागी होणार आहे, असे पक्षातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement