BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ई – बस निविदा प्रक्रियेला मुदतवाढ

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- स्मार्ट सिटी अंतर्गत बॅटरीवर चालणाऱ्या 500 वातानुकूलित ई बसही खरेदी करण्यात येणार आहेत. त्यातील पहिल्या टप्यात 150 बस खरेदीची निविदा प्रक्रिया राबवण्यात अली आहे. 18 सप्टेबर रोजी निविदा जाहीर करण्यात असून 9 ऑक्‍टोबर निविदा भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र, निविदा प्रक्रियेत जास्त स्पर्धा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून निविदा प्रक्रियेला 17 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेत ई – बस खरेदी करण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार दोन टप्प्यात भाडेतत्वावर 500 ई – बस खरेदी करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून यासंदर्भात प्रक्रिया सुरु होती. अखेर गेल्या महिन्यात प्रशासनाने पहिल्या टप्प्यात 150 बसेसची निवीदा जाहीर केली.

यामध्ये 25 बसेस 9 मीटर नॉन बीआरटी एसी तर उर्वरीत 125 बसेस 12 मीटर बीआरटी एसी बसेस ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्‍ट बेसिस (जीसीसी) वर घेण्याचे नियोजन आहे. याबातची निविदा प्रसिध्द करण्यात आली असून निविदेचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. सुरवातीला 150 आणि नंतर 350 अशा दोन टप्प्यात या बसेस घेण्यात येणार आहेत. देशातील कुठल्याच राज्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणात ई – बसेस धावत नाहीत. यामुळे एकावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात ई – बस खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. यामुळे जास्तीतजास्त अर्ज येऊन स्पर्धा वाढावी, याउद्देशाने निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

.

HB_POST_END_FTR-A1
.