Pune: जिल्ह्यातील शेती-फळबागा आणि पडझडीचे पंचनामे करावेत – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज- मदत व पुनर्वसन खात्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत चर्चा करून पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी, शेतपिके, फळबागा, शेत बंधारा, घरे अशा अनेक प्रकारच्या नुकसानीचे कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांनी पुणे जिल्ह्यातील संयुक्त पंचनामे तयार करून तात्काळ अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, बहुउद्देशी पिके तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे. तसेच शहरी भागामध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

याप्रसंगी खासदार गिरीश बापट, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे तसेच प्रदीप कंद, नामदेव ताकवणे, पुणे जिल्हा सरचिटणीस सचिन सदावर्ते, अविनाश बवरे, धर्मेंद्र खांडारे, पांडुरंग ठाकूर, अशोक उमरेगकर, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, रोहिदास उंद्रे पाटील, दिलीप खैरे, सचिन लंबाते, डॉ ताराचंद कराळे, नगरसेवक विशाल खंडेलवाल, ललित बालघरे यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.