Maharashtra Political Crisis : पुण्याला मंत्रिपद मिळणार? ठाकरे सरकार कोसळताच भाजप आमदारांचे मंत्रिपदासाठी लॉबिंग

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरी (Maharashtra Political Crisis) नंतर बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर आता नव्याने येणाऱ्या सरकारमध्ये भाजपचा समावेश निश्चित असल्याने पुण्यात असणाऱ्या भाजपच्या आमदारांनी मंत्री पदासाठी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. मंत्री पदासाठी त्यांचं नाव निश्चितच आहे. याशिवाय पुणे शहराला आणखी एखादं मंत्रिपद मिळू शकते अशी देखील चर्चा सुरू आहे.

पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे किंवा पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांची आगामी मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यात आमदार राहुल कुल किंवा महेश लांडगे यांच्यापैकी एकाला मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. माधुरी मिसाळ या पक्षातील ज्येष्ठ आमदार आहेत. पर्वती मतदारसंघातून त्या सलग तिसऱ्यांदा निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळू शकतं अशी चर्चा (Maharashtra Political Crisis) खुद्द भाजपमध्येच आहे.

Todays Horoscope 30 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

याशिवाय पुण्यातील कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांना देखील मंत्री मंडळात जागा मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. इथे एक जुलै रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असेल याविषयीचे आराखडे बांधण्यास सुरुवात झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.