BNR-HDR-TOP-Mobile

Pune : माणसांना विभाजित ठेवण्याचा देशात प्रयत्न -नागनाथ कोत्तापल्ले; सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे उद्घाटन

0

एमपीसी न्यूज – समाजामध्ये महापुरूषांची पळवापळवी सुरू आहे़ त्यामुळे महापुरुषांच्या कार्याचे महत्त्व मर्यादित रहात आहे़ असे वातावरण विषारी असून येणाºया काळात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील़ देशात माणसांना विभाजित ठेवण्याचे काम नियोजितपणे सुरू असून याबाबत सर्वसामान्यांना जागे करण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले़.

कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पेठेतील एस.एम.जोशी सभागृहात सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़.

नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, ”कोणत्याही विचार आणि पक्षाशी एकनिष्ठ असणे महत्त्वाचे असते़ अन्यथा त्या विचारांना काहीही अर्थ उरत नाही़. जागतिकीकरणानंतरच्या काळात स्वत:ला विकून घेण्यासाठी अनेकजण तयार झाले आहेत़. माध्यमांमध्येही कोणता विचार राहिलेला नाही़ फक्त निवडणूक म्हणजे लोकशाही नाही़ आपल्या भावना, सर्वसामान्यांना विचार मांडण्याची मोकळीक असली पाहिजे़. सर्वसामान्यांना धाडसाने बोलता आले पाहिजे, तर लोकशाही यशस्वी होते़. पण, आताच्या काळात जनता बोलायला घाबरते, ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक आहे़.

सध्या पत्रकार, व्यापारी यांच्यापासून सर्वसामान्यांपर्यंत कोणालाही सरकारवर टीका करता येत नाही किंवा मत मांडता येत नाही़ अशाप्रकारे, सध्या देशात परिस्थिती हुकूमशाहीकडे जात असून, ख्रिश्चन, मुस्लिम, कम्युनिस्ट यांना शत्रू ठरविले जाते़ ”

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3