Pune : ‘करोना’चा फैलाव रोखण्यासाठी चेह-यावर मास्क लावणे बंधनकारक -जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूंचा प्रसार कार्यालयांमध्ये होऊ नये. तसेच जिल्हयात अधिकारी, कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये, म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. तसेच चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक असल्याचेही ते म्हणाले.

पुणे महानगर विकास क्षेत्रात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादूर्भाव विचारात घेता, शासकीय कार्यालयांमध्ये या विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर सर्व कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयीन प्रवेशद्वारापासून ते कार्यालय सोडेपर्यंतच्या कालावधीमध्ये चेह-यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या क्षेत्रातील सर्व कार्यालयांमध्ये प्रवेश करणा-या सर्व अभ्यागतांना देखील चेह-यावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. अन्यथा, त्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही, असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.