BNR-HDR-TOP-Mobile

Pune : भावाचा जीव वाचविण्यासाठी हवेत गोळीबार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- दुचाकीस्वाराबरोबर झालेल्या वादामधून आपल्या भावाला जबर मारहाण होत असल्याचे पाहून त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याच्या भावाने हवेत गोळीबार केला. ही घटना शुक्रवारी (दि. 30) कोंढव्यामधील कोणार्कपुरम सोसायटीजवळ रात्री साडेआठ वाजता घडली. 

कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी सुफियान रफिक खान (वय 33, रा़ कौसरबाग, कोंढवा), उबेद सईद खान (वय 30, रा़ रविवार पेठ) आणि अब्दुला रजा शेख (वय 28, रा़ क्लाऊड नाईन सोसायटी, कोंढवा) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अब्दुल दुराज गोरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल दुराज गोरे (वय 19, रा़ कोंढवा) हा त्यांची मोटार घेऊन शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता कोंढव्यातील कोणार्क पुरम सोसायटीजवळून जात होता़. सोसायटीमध्ये वळत असताना त्याच्या गाडीसमोर एक मोटारसायकलस्वार अचानक आल्याने त्याला गोरे यांनी थांबण्याचा इशारा केला. त्यावरून मोटारसायकलस्वाराने शिवीगाळ करत फिर्यादी अब्दुल गोरे याला हातातील हेल्मेटने मारहाण केली़. त्यानंतर त्याच्या दोन साथीदारांना बोलावून घेतले व गोरे याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली़.

मार चुकविण्यासाठी अब्दुल हा पळत सोसायटीत शिरला व पार्किंगजवळ गेला. आरोपीही त्यांचा पाठलाग करत त्यांच्याजवळ पोहचले़ त्याला लोखंडी रॉडने मारहाण करु लागले़. अब्दुला यांचा आरडाओरडा ऐकून त्यांचा चुलत भाऊ हसन समीर गोरे हा तिथे आला. मारहाण होत असलेली पाहून हसन याने त्याच्याकडील पिस्तुल काढले व हवेत गोळीबार केला़. पिस्तुल पाहून आरोपी पळून गेले़. कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

HB_POST_END_FTR-A4

.