Pune: रविवारी 1762 नव्या रुग्णांची भर तर 1203 जणांना डिस्चार्ज; 31 बाधितांचा मृत्यू

Pune: Today 1762 new patients added while 1203 discharged; Death of 31 corona victims 639 रुग्ण गंभीर असून, त्यात 392 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

0

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या 2 हजार 585 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1762 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 1203 जण कोरोनातूून ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 31 जणांचा मृत्यू झाला आहे. 639 रुग्ण गंभीर असून, त्यात 392 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनाचे पुणे शहरात 57 हजार 523 रुग्ण झाले आहेत. 38 हजार 117 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या आजारामुळे 1 हजार 366 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 18 हजार 40 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

बाणेरमधील 87 वर्षीय पुरुषाचा ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 66 वर्षीय महिलेचा राव नर्सिंग होममध्ये, गोखलेनगरमधील 73 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 78 वर्षीय पुरुषाचा एआयसीटीएस हॉस्पिटलमध्ये, आकाशवाणी परिसरातील 38 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, हडपसरमधील 62 वर्षीय पुरुषाचा आणि 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

तर कात्रजमधील 60 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, सदाशिव पेठेतील 40 वर्षीय पुरुषाचा, पाषाणमधील 59 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, उरुळी देवाचीमधील 52 वर्षीय महिलेचा, गणेश पेठेतील 65 वर्षीय महिलेचा, हडपसरमधील 70 वर्षीय पुरुषाचा, वडगाव बुद्रूकमधील 59 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 57 वर्षीय पुरुषाचा सिमबायोसिस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

उत्तमनगरमधील 55 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, महर्षीनगरमधील 67 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 72 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, धनकवडीतील 61 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 80 वर्षीय पुरुषाचा, कोंढवा बुद्रुकमधील 55 वार्षिक पुरुषाचा, भवानी पेठेतील 87 वर्षीय महिलेचा पुणे अ‍ॅडवेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

शिवाजीनगरमधील 62 वर्षीय महिलेचा, रविवार पेठेतील 66 वर्षीय महिलेचा, हडपसरमधील 75 वर्षीय पुरुषाचा, बोपोडीतील 65 वर्षीय पुरुषाचा, टिंगरेनगरमधील 60 वर्षीय महिलेचा, गुरुवार पेठेतील 59 वर्षीय पुरुषाचा, आंबेगाव बुद्रुकमधील 48 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 30 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 67 वर्षीय पुरुषाचा लोकमान्य हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like