Pune : विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजवणे आवश्यक- डॉ. जयंत नारळीकर

एमपीसी न्यूज- शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान हा विषय शिकवताना केवळ पुस्तकांवर अवलंबून न राहता त्यातील मर्म विद्यार्थ्यांना समजावून सांगून मुलांमध्ये शालेय जीवनापासूनच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या दृष्टीने जिजाऊ फाउंडेशनने समाजासमोर स्तुत्य आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी केले.

पुण्यातील जिजाऊ फाउंडेशनतर्फे जनता वसाहत येथील प्रतिकूल आर्थिक व सामाजिक परिस्थितीमधील विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांच्या सोबत पुणे विद्यापीठातील आयुका या विज्ञान शोधिकेमध्ये डॉ. जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधत मनसोक्त गप्पा मारल्या. विज्ञानातील गमती जमती, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, अवकाश विज्ञान याविषयीची माहिती दिली. मंगला नारळीकर यांनी गणित विषयाचा अभ्यास देखील किती रंजकपणे करता येतो हे सांगितले.

जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती ढमाळ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना नारळीकर दाम्पत्याचे आभार मानले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.