Pune: जगात एका दिवसात 1,344 कोरोनाबाधितांचा मृत्यू, अब तक 11,184!

एमपीसी न्यूज – जगात एका दिवसात तब्बल 1,344 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात देण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनाने जगात एकूण 11,184 बळी घेतले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 66 हजार 73 असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. जगातील कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू युरोप खंडात त्यातही इटली देशात झाले आहेत.  सर्वात कमी लागण ही आफ्रिका खंडात असल्याचे दिसून येते. 

टाकूयात एक नजर जगभरातील कोरोनाच्या सद्यस्थितीवर…

जागतिक आरोग्य संघटना (दि. 21 मार्च 2020)

कोरोना विषाणू आजार 2019 (कोविड-19)

गेल्या 24 तासातील नवीन केसेस कंसात दिला आहे.

 

जागतिक 
2,66,073 कोरोनाबाधित (32 000)
11,184 मृत्यू (1344)

 

वेस्टर्न पॅसिफिक रिजन
94,037 कोरोनाबाधित (688)
3,426 मृत्यू (21)

 

युरोपियन रिजन
128 541 कोरोनाबाधित (23 950)
6000 मृत्यू (1 101)

 

साऊथ ईस्ट एशिया रिजन
979 कोरोनाबाधित (61)
38 मृत्यू (7)

 

इस्टर्न मेडिटेरॅनियन रिजन
22 355 कोरोनाबाधित (1596)
1466 मृत्यू (154)

 

रिजन ऑफ अमेरिकाज
18,877 कोरोनाबाधित (5606)
235 मृत्यू (57)

 

आफ्रिकन रिजन
572 कोरोनाबाधित (99)
12 मृत्यू (4)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.