Pune : मेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतुकीत आजपासून बदल

एमपीसी न्यूज- मेट्रोच्या पिलरवर सेगमेंट टाकण्याच्या कामासाठी कर्वे रस्त्यावरील वाहतुकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा बदल करण्यात आला असल्याची माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली आहे. हा बदल आज, बुधवार 8 जानेवारी ते सोमवार 20 जानेवारी दरम्यान असणार आहे.

वनाझ ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून कर्वे रस्त्यावर यशवंतराव चव्हाण चौकात मेट्रोच्या पिलरवर सेगमेंट बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

त्यामुळे पूना हॉस्पिटलकडून दुचाकीच्या पुलावरून येणाऱ्या वाहनांनाही डेक्कन जिमखाना भागात जाण्यासाठी रसशाळा चौकातून युटर्न घेऊन जावे. तसेच नळस्टॉप कडून येऊन पूना हॉस्पिटलकडे दुचाकीच्या पुलावर वळणाऱ्या वाहनांनी शेलारमामा चौकातून युटर्न घेऊन जावे अशी सूचना करण्यात आली आहे. वाहनचालकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.