Pune : गणेश प्राणप्रतिष्ठापना निमित्त शहराच्या वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज- जगभरात प्रसिद्ध असलेला पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांनी सुरू होत आहे. शहरात गणेश मूर्ती खरेदीसह इतर साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होणार असल्याने बुधवारी आणि गुरुवारी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला जाणार आहे. डेंगळे पूल ते शिवाजी पूल श्रमिक भवन, कसबा पेठ पोलीस चौकी, जिजामाता चौक ते मंडई या दरम्यान प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने तेथील वाहतूक मार्गात बदल केला आहे.

वाहतुकीस बंद असलेले मार्ग

शिवाजी रस्ता : गाडीतळ पुतळा ते गोटीराम भैय्या चौक वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

पर्यायी मार्ग : गाडीतळ पुतळा चौकातून डावीकडे वळून संताजी घोरपडे रस्त्यावरून कुंभार वेस चौक ते शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. सूर्या हॉस्पिटल समोरून पवळे चौक, कमला नेहरू रूग्णालय समोरून 15 ऑगस्ट चौक, नगरी चौकातून इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगर कडून शिवाजी रस्त्याने स्वारगेट कडे जाण्यासाठी स.गो बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याचा वापर करावा.

झाशीची राणी चौक ते खुडे चौक ते डेंगळे पुलमार्गे कुंभार वेसकडे जाणाऱ्या चालकांनी खुडे चौक मधून महापालिकेसमोरून शिवाजी पूलमार्गे गाडीतळ पुतळा चौकात डावीकडे वळण घेऊन कुंभारवेस चौक या मार्गाचा वापर करावा.

कुंभारवेस चौक-डेंगळे पूल, साठे चौक ते शिवाजी पूल, अण्णाभाऊ साठे चौक ते धान्यगोदाम हे सर्व रस्ते बंद असणार आहेत.

पर्यायी मार्ग : पुणे स्टेशनकडून महापालिकेकडे जाणाऱ्या वाहनांना शाहीर अमर शेख चौकांमधून कुंभारवेस मार्गे न जाता आरटीओ चौक, सीओईपी चौक मार्गे जावे. स्टेशन परिसरातून फरासखाना परिसरात जाणाऱ्या वाहनचालकांनी कुंभारवेस चौकांमधून डावीकडे वळण घेऊन पवळे चौक मार्गे गणेश रस्त्यावर येऊन इच्छितस्थळी जावे.

सारसबागेजवळील सिंहगड रस्त्यावर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर यादरम्यान वाहतूक सुरू राहील. परंतु येथे ‘नो पार्किंग’ असणार आहे. आवश्यकतेनुसार बॅरिकेड्स आणि दोराचा वापर केला जाईल.

वाहतूक सुरू असलेले मार्ग

फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज

अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक

सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक

मंगल टॉकीजसमोरील प्रीमिअर गॅरेज लेनमधून शिवाजी रोड ते खुळे चौक

पार्किंग व्यवस्था

मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा कॅनॉलपर्यंत

जमनालाला बजाज पुतळा ते पुरम चौक डाव्या बाजूस

निलायम पूल ते सिंहगड रस्ता

न्या. रानडे पथावर कामगार पुतळा ते शिवाजी पुतळा

टिळक पूल ते भिडे पूल नदीपात्रातील रस्ता

मंडई येथील दोन्ही पार्किंग तळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.