Pune News : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 15 रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार

एमपीसी न्यूज : शहरातील वाहतुक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी वाहतुकीशी संबधित सर्व यंत्रणांची एक समिती गठीत केली आहे. त्या समितीकडून पहिल्या टप्प्यात अतिवाहतूकीच्या पंधरा मार्गांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.(Pune News) वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, पीएमपीएलकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर गर्दीच्या मार्गांवरील कोंडी सोडविण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, याबाबत सविस्तर आभ्यास करण्यात येईल.

पोलीस आयुक्तालयात मंगळवारी (31 जानेवारी) शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल), महामेट्रो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), स्मार्ट सिटीचे अधिकारी आदी या वेळी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी, उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे कोंडीत भर पडत आहे. अरुंद रस्ते, काही भागांत सुरु असणारी मेट्रोची व इतर विकास कामे,अनेक भागांतील रस्त्यांवरील अतिक्रमणे यामुळे शहरात ठिकठीकाणी कोंडी होत असल्याचे निरीक्षण बैठकीत अधिकाऱ्यांनी नोंदविले.

Pune : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या राज्य कार्यकारीणी सदस्यपदी नाईक यांची नियुक्ती

शहरातील कोंडी सोडविण्यासाठी पोलीस, महापालिका, पीएमपीएल, मेट्रोसह अन्य संस्थांतील अधिकारी एकत्रित काम करणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्यात शहरातील (Pune News) गर्दीचे 15 रस्ते निवडण्यात येणार आहेत. या रस्त्यांची पाहणी, तसेच सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्या रस्त्यांवरील बसथांबे, सिग्नल, पदपथ याबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे. वाहतूक कोंडीची कारणे शोधून उपाययोजना करण्यात येणार आहेत.

शहरातील गर्दीच्या रस्त्यांची पाहणी करून वाहतूक कोंडीचे कारण तसेच उपाययोजना केल्या जाणार आहेत. पोलीस, महापालिका, पीएमपीएमएल, मेट्रोसह अन्य संस्थांमधील प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती तयार केली जाणार आहे. या समितीतील अधिकारी समन्वय साधून एकत्रित काम करणार आहेत.

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस, महापालिका, पीएमपीएल, मेट्रोचे अधिकारी एकत्रित काम करणार आहेत. पहिल्या टप्यात गर्दीचे 15 रस्ते निवडण्यात आले आहेत.(Pune News) टप्प्याटप्याने शहरातील अन्य रस्त्यांची पाहणी करून वाहतूक सुधारणेबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.