Pune : नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून एका दिवसात अडीच लाखांचा दंड वसूल

वाहतुकीचे नियम मोडणे आता पडणार महागात

एमपीसी न्यूज – वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सोमवारी (दि. 6) नियमभंग करणाऱ्या 919 वाहनचालकांकडून एकूण दोन लाख 54 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला.

नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित चालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये भरधाव वेगात रेसिंग बाईक्स चालविणा-या 36 वाहनचालकांकडून 23 हजार 100 रुपये, बुलेट मोटारसायकलला बेकायदेशीररित्या वेगवेगळ्या आवाजाचे सायलेन्सर लावलेल्या 200 वाहनचालकांकडून एक लाख 20 हजार 400 रुपये, ट्रिपलसिट दुचाकी चालविणा-या 265 वाहनचालकांकडून 42 हजार 100 रुपये दंड तर नो पार्कींगच्या ठिकाणी वाहने पार्क करणा-या 418 वाहनचालकांकडून 69 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला.

ही मोहीम यापुढेही चालू राहणार असून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन पुणे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.