Pune : नियमभंग करणा-या तब्बल 1882 वाहनचालकांचे लायसन्स सहा महिन्यासाठी निलंबित

एमपीसी न्यूज – पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतुकीच्या समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणा-या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई तीव्र केली आहे. पोलिसांनी 1882 वाहनचालकांचे लायसन्स सहा महिन्यासाठी निलंबित करून 279 जणांच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशन रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी वाहतूक नियमभंग करणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नियमभंग केल्यास केवळ दंड भरून सुटण्याचा प्रयत्न वाहनचालक करतात नियमभंग करणा-या काही जणांनी पासपोर्टसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या पडताळणीत काही वाहनचालकांनी नियमभंग केल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा वाहनचालकांची माहिती पासपोर्ट ऑफिसकडे देऊन त्यांना पासपोर्ट देण्यात येऊ अशी शिफारस केली आहे.

नियमभंग करणा-या 1882 वाहनचालकांचे लायसन्स सहा महिन्यासाठी निलंबित करून 279 जणांच्या पासपोर्टवर अटकाव घालण्याची शिफारस पोलिसांनी केली असून भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.