HB_TOPHP_A_

Pune : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून नाकाबंदी करून दंड वसूल

21 हजार 214 वाहनचालकांकडून तब्बल 61 लाख 37 हजार 250 दंड वसूल

424

एमपीसी न्यूज – वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक विभागाकडून आलेल्या एसएमएसकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांना आता दंडाला सामोरे जावे लागणार आहे. अशा वाहनचालकांच्या विरोधात पुणे शहर वाहतूक विभागाने कंबर कसली असून नाकाबंदी करून या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. नाकाबंदीच्या कारवाई मध्ये 15 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत 21 हजार 214 वाहनचालकांकडून तब्बल 61 लाख 37 हजार 250 एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

HB_POST_INPOST_R_A

वाहतूक शाखेकडून पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत असल्यामुळे हे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम मोडणा-या चालकांवर कारवाई केली जाते. शहरातील चौकाचौकांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे वाहतूक कर्मचा-यांकडून वेळोवेळी वाहनचालकांवर नियमभंग केल्याप्रकरणी केस दाखल करून एसएमएस द्वारे चालकांना त्याबद्दल कळविण्यात आले. परंतु अशा नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाई करुन देखील चालक दंड न भरता एसएमएसकडे दुर्लक्ष करतात.

त्यामुळे आता वाहतूक विभागाकडून अशा दंड न भरलेल्या चालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून पूर्वी केलेल्या नियमभंगाप्रकरणी दंड वसूल करण्यात येत आहे. हा दंड वसूल करण्यासाठी वाहतूक विभागाकडून शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. 15 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत नाकाबंदीच्या कारवाईमध्ये 21 हजार 214 वाहनचालकांकडून तब्बल 61 लाख 37 हजार 250 एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

यापुढे देखील ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार असून ज्या चालकांनी नियमभंगाचा दंड भरला नसेल त्यांनी जवळील वाहतूक विभाग कार्यालयात जाऊन दंड लवकरात लवकर भरून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: