Pune : दंडाऐवजी तडजोड करून पैसे घेऊन वाहने सोडणारा वाहतूक पोलीस निलंबीत

एमपीसी न्यूज – जॅमर कारवाई केलेल्या वाहन मालकाकडून नियमानुसार दंड वसूल करण्याऐवजी तडजोडीअंती दीड हजार रुपये घेऊन ते स्वखिशात घालणाऱ्या वाहतूक पोलिसाला सेवेतून निलंबीत करण्यात आले. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले.

विक्रम फडतरे (नेमणूक, भारती विद्यापीठ वाहतूक शाखा) असे निलंबीत केलेल्या पोलिसाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता बालाजीनगर येथील पंपामध्ये सागर राऊत (रा.राजेवाडी, ता खंडाळा, ज़ि सातारा) यांनी त्यांची महिंद्रा मॅक्स उभी केली होती. यावेळी या भागात कर्तव्यावर असलेल्या फडतरे यांनी राऊत यांच्या गाडीला जॅमर लावला. यानंतर त्यांना 5 हजारांची पावती करण्यास सांगितले. मात्र, तडजोडीअंती दीड हजार रुपये घेतले आणि जॅमर काढून गाडी सोडून दिली. याबाबत राऊत यांनी वाहतूक शाखेकडे पोलीस कर्मचारी फडतरे यांच्याविरोधात तक्रार केली. याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी केली. याची दखल घेत तपासणी केली.

यात तथ्य आढळून आल्याने फडतरे यांच्यावर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी शुक्रवारी निलंबनाची कारवाई केली आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.