Pune : मुसळधार पावसामुळे सिग्नल यंत्रणा कोलमडून ट्रॅफिक जॅम

एमपीसी न्यूज- सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे शहराच्या 25 चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने सोमवारी पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाली. त्यामुळे ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी आठ वाजल्यापासून जवळपास दुपारी दीड वाजेपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनांची गर्दी दिसून आली.

_MPC_DIR_MPU_II

पुणे शहरात सोमवारी सकाळपासूनच सर्वत्र पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवरील सखल भागात पाणी साठले. तसेच रस्ते निसरडे झाल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. त्यातच 25 चौकातील सिग्नल बंद पडल्यामुळे या संकटात आणखी भर पडली. सकाळच्या वेळेत शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गामुळे शहरात नेहमीच गर्दी असते. त्यात सिग्नल यंत्रणा बंद पडल्यामुळे ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या पुणेकरांचे प्रचंड हाल झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.