Pune: जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली; पंतप्रधान कार्यालयात  उपसचिव म्हणून नियुक्ती 

तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्हाधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे. : Transfer of Collector Naval Kishore Ram; Appointment as Deputy Secretary in the Prime Minister's Office

एमपीसी न्यूज – पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज (मंगळवारी) बदली झाली आहे. दिल्लीला  पंतप्रधान कार्यालयात  उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती  करण्यात आली आहे.

त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर त्यांचे बारीक लक्ष होते.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज बदली झाली आहे. पुण्याहून थेट दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदेश निघाल्यापासून नवल किशोर राम यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्हाधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.

पण,  एका आठवड्याच्या आतच राम दिल्लीत उपसचिव म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.