Pune : कात्रज-कोंढवा रस्ता विकसित करण्यासाठी पुणे महानगरपालिकाकडे ‘ती’ जागा हस्तांतरित

एमपीसी न्यूज – कात्रज-कोंढवा रस्ता विकसित करण्याकरिता जागा संपादन करणेकरिता अनेक दिवसांपासून पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कार्यवाही चालू होती. हा रस्ता विकसित करण्याकामी या भागातील जागा मोठ्या प्रमाणावर पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरित झालेल्या आहेत.

या परिसरातील कात्रज-कोंढवा रस्ता बाधित जागांपैकी धारिवाल ग्रुप यांच्या मालकीची सुमारे साडेपाच एकर जागा टी.डी.आर. विकसन हक्काचे मोबदल्यात संबंधित रस्ता विकसित करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडे आज हस्तांतरित करण्यात आली.

  • मे.धारिवाल ग्रुप यांच्या वतीने महेश राठी आणि यादव यांनी प्राथमिक ताबा प्रमाणपत्र आज शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे सुपूर्त केले. याप्रसंगी अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, सुनील कदम, विकास ढेरे, सतीश जाधव आदी उपस्थित होते.

कात्रज-कोंढवा रस्ता एकूण 3.40 किलोमीटर असून रस्ता विकसित करणेसाठी सुमारे 75 % जागा टी.डी.आर. विकसन हक्काचे मोबदल्यात मनपाच्या ताब्यात आलेली असून उर्वरित 25% जागा नजीकच्या काळात मनपाच्या ताब्यात येणार आहे. त्यामुळे ‘हा’ रस्ता विकसित करणेचा मार्ग मोकळा झालेला असून या परिसरातील वाहतुकीचा प्रश्न लवकर मार्गी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.