Pune : पुणेकरांच्या भेटीस दिवाळीसाठी आदिवासी निर्मित पर्यावरण पूरक दिवे,आकाशकंदील, लॅम्पशेड

एमपीसी न्यूज – पुणेकरांच्या भेटीस दिवाळीसाठी देशभरातील अनेक आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले दिवे ,आकाशकंदील, लामणदिवे, लॅम्पशेड, दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृहसजावटीच्या अनेक कलाकृतींचे पर्वती पायथा येथील महिला मंडळात असलेल्या ‘ट्राईब छत्री ‘ कलादालनात 22 ते 27 ऑक्टोबर पर्यंत प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

केंद्र शासनाचा आदिवासी विकास विभागाची मान्यता असलेल्या या प्रदर्शन केंद्रात आपल्याला आवडलेल्या आदिवासी व ग्रामीण कलाकाराच्या वस्तू, दिवे विक्रीस देखील उपलब्ध करून दिले जातात. प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते रात्री 7 असल्याचे पूर्वा परांजपे यांनी सांगितले. ‘ट्राईब छत्री’ चे संस्थापक श्रीकृष्ण परांजपे आणि पूर्वा परांजपे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .

या प्रदर्शनात बांबू ,पाम लिफ(पाम वृक्षाची पाने) पासून बनवलेले आकाशकंदील,सिरॅमिक च्या रोली कॅण्डल्स, लालटेन ,लेदर लॅम्प शेड ,हँगिंग लॅम्प ,टेबल टॉप लॅम्प ,कॉर्नर टेबल लॅम्प ,लोखंड मधील रॉट आयर्न प्रकारातील लामणदिवे आणि पर्यावरण पूरक असे अनेक आकर्षक आणि संग्राह्य दिवे आहेत. आंध्र प्रदेश ,ओडिशा ,राजस्थान (भिल्ल गरसिया ),महाराष्ट्रातील मेळघाटातील कोरकु आदिवासींनी बनवलेले ,आणि छत्तीसगड येथील माडिया आदिवासीं निर्मित दिवे आणि शोभेच्या वस्तूंचा या प्रदर्शनांत समावेश आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.