Pune : दिव्यांग मुलांनी ‘ट्राईब’मधील विद्यार्थ्यांसोबत साजरी केली दिवाळी

एमपीसी न्यूज – दिवाळीचा सण हा आनंद देणारा आणि आयुष्यातील प्रकाश वाढवणारा सण म्हणून साजरा केला जातो. हाच आनंद ‘ट्राईब स्टुडंट ऑकोमोडेशन’ मधील विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांसोबत वाटला. ‘दिवाली विथ अ कॉज’ म्हणून या विद्यार्थ्यांनी ‘अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट’ येथील ७० दिव्यांग मुलांसोबत दिवाळीचा सण साजरा केला.

यावेळी मुलांनी येथे वेगवेगळे खेळ, चित्र काढणे अशा विविध उपक्रमांचा आनंद घेतला. त्यांनतर ‘ट्राईब’ येथील उपाहारगृहात त्यांनी ‘कार्टून’ कार्यक्रम बघत आनंद लुटला. दिवाळीचा सण विविध खाद्य पदार्थांशिवाय अपूर्णच असतो; तसा विविध खाद्यपदार्थांसह भोजनाचाही मुलांनी आस्वाद घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.