Pune : फर्ग्युसन महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या 59 व्या पुण्यतिथी (Pune)  निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील त्यांचे वास्तव्य असणाऱ्या खोलीत अभिवादनासाठी नागरिकांची रीघ लागली होती.

डीईएसचे माजी अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्रबंधिका डॉ. सविता केळकर, संचालक मिलिंद कांबळे, अनिल भोसले, प्रा. प्राजक्ता प्रधान, प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, डॉ. प्रकाश पवार, प्रा. सुभाष शेंडे, प्रा. नारायण कुलकर्णी, डॉ. आनंद काटिकर, श्रध्दा कानेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Mp Shrirang Barne : अमृत भारत अंतर्गत चिंचवड,देहूरोड, लोणावळा रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट

सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रवास या खोलीत चित्रबद्ध करण्यात आला होता. पुणे विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठाची डी. लिट. पदवी स्वीकारताना सावरकरांनी परिधान केलेला झगे आणि त्यांच्या वापरातील विविध वस्तू आकर्षण ठरत होत्या.

फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना 1902 ते 1905 या कालावधीत सावरकर या वसतिगृहात वास्तव्यास होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.