Pune : पार्किंगच्या किरकोळ वादातून गाडीसह महिलेला ही पेटवून देण्याचा प्रयत्न,चौघांना अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील खराडी परिसरात (Pune)केवळ पार्कींगच्या वादातून गाड़ीसह एका महिलेच्या अंगावर रॉकेल टाकत तिला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी आकाश सोदे (वय 23 ),नयत गायकवाड (वय 19 ), सूरज बोरुडे (वय 23), विशाल ससाने (वय 20) या चार आरोपींना चंदननगर पोलिसांनी अटक केली. तर या घटनेतील मुख्य आरोपी धीरज सपाटे हा पसार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज सपाटे(Pune) आणि फिर्यादी महेश राजे हे खराडी येथील तुकारामनगर येथे राहण्यास आहेत. मागील काही दिवसापासून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पार्किंगवरून वाद सुरू होता. आरोपी धीरज सपाटे हा काल त्याच्या मित्रासोबत फिर्यादी महेश राजे यांच्या घरासमोरील चार चाकी वाहनांवर लाकडी दांडक्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर गाडीवर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आली.

 

घराबाहेर काय गोंधळ सुरू आहे. हे पाहण्यास फिर्यादी महेश राजे व त्यांच्या भाडेकरू महिला आल्यावर, त्यांच्या अंगावर आरोपी धीरज सपाटे याने पेट्रोल टाकले. तेवढ्यात महिला या तेथून पळून गेल्या. यावेळी जमा झालेल्या लोकांना धीरज सपाटेने, जर यामध्ये कोणी आलं तर सोडणार नाही अशी धमकी देखील दिली.

या प्रकरणी चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.