Pune : न्यायालयाच्या आवारातच ‘तलाक तलाक तलाक…’

एमपीसी न्यूज- तिहेरी तलाक विरोधी कायदा झालेला असताना पुण्यात चक्क न्यायालयाच्या आवारातील सार्वजनिक शौचालयात एका पती महाशयांनी आपल्या पत्नीला बेकायदा तलाक दिला. लष्कर न्यायालयाच्या परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबतची माहिती अशी की, कोंढवा बुद्रुक येथे राहणाऱ्या एका 30 वर्षीय विवाहितेचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाह झाल्यावर पती, सासू, सासरे, आणि नणंद यांनी घरगुती कारणावरून; तसेच एटीएम कार्ड परत घेतल्याच्या कारणावरून तिला मारहाण केली. सासरच्या मंडळींडून सतत होणाऱ्या जाचाला कंटाळून तिने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी सध्या लष्कर न्यायालयात सुरू आहे.

सुनावणी सुरू असताना संबंधित विवाहित महिला न्यायालयात उपस्थित होती. दरम्यान, ती तेथील सार्वजनिक शौचालयात गेली असता तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी तिला गाठून ‘तू आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चांगले केले नाहीस. आम्हाला काहीही फरक पडत नाही. माझे दुसरे लग्न ठरल्याने मी तुला तलाक देत आहे,’ असे म्हणून संबंधित विवाहितेला बेकायदा तलाक दिला. त्यानंतर तिला शिवीगाळ करून धक्‍काबुक्‍की केली. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात ‘मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण’ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जी. बी. कुलाळ तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.