Pune – ब्रेकफेल झालेल्या ट्रकच्या धडकेत तरूण गंभीररीत्या जखमी

एमपीसी न्यूज –  ब्रेकफेल झालेल्या ट्रकच्या धडकेत एक 24 वर्षाचा तरूण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना आज शनिवारी (दि.1) दूपारी अडीच च्या सुमारास दत्तनगर चौकाजवळ  घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कात्रजहून न-हेच्या दिशेने एक ट्रक येत होता. त्या ट्रकचा ब्रेकफेल झाल्याने दत्तनगर चौक येथे आल्यानंतर एका बसला धडक दिली. आणि पूढे जाऊन ट्रकने एका अॅक्टीव्हा गाडीवरील तरूणीला धडक दिली. अॅक्टीव्हावरील तरुणी त्या धडकेने रस्त्याच्या बाजूस पडली.दरम्यान तिथून जाणा-या पादचारी मुलाला ट्रकने धडक दिली त्यामुळे तो गाडीखाली आला. दरम्यान अग्निशमन दलाचे जवान योगेश चव्हाण हे आपल्या दूचाकीवरून जात असताना त्यांनी हा अपघात पाहिला. त्यांनी तात्काळ लोकांच्या मदतीने गाडीमध्ये अडकलेल्या तरूणाला यांनी बाहेर काढले. आणि पोलीसांच्या गाडीत बसवून नवले हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी पाठविले. अपघातात मुलगा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.