मंगळवार, नोव्हेंबर 29, 2022

Pune : पुण्यात ट्रक अपघाताचे सत्र कायम; सहा गाड्यांचे पुन्हा नुकसान

एमपीसी न्यूज : पुण्यामध्ये ट्रकच्या (Pune) एकहुन अधिक गाडयांना धडक देण्याचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. आज पुन्हा एकदा मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात एका ट्रकने 6 कारला धडकून त्यांचे नुकसान केले आहे. सुदैवाने कोणीतीही जीवितहानी झाली नाही.

आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास पुणे-मुंबई लेनवर किमी 38:100 येथे अपघात झाला. ट्रक क्र MH 12 LT 7932 हा पुणे मुंबई लेनवर जात असताना बोरघाटमध्ये किमी 38:100 येथे त्याने 6 कारला धडक दिली व घासून गेला.

PCMC News: पाणीपुरवठा प्रकल्प सल्लागाराला वाढीव सव्वादोन कोटींचे शुल्क

1)इनोव्हा कार क्र :- MH 12 GK 8833
2) एर्टीगा कार क्र :- MH 01 BF 8531
3) एर्टीगा कार क्र :- GJ 15 CK 0365
4) एर्टीगा कार क्र :- MH 14 JM 5455
5) इनोव्हा कार क्र :- MH 14 JA 1385
6) पोलो कार क्र :- MH 12 TS 5407

या सहा गाड्यांचे नुकसान झाले (Pune) आहे.

अनिल शिंदे (पोलीस उप निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट) म्हणाले, की अपघाताबाबत 8.50 वाजता कळल्यावर ते 9 वाजता तेथे पोहोचले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत चालू करण्यात आली. अपघाताची माहिती खोपोली पोलीस ठाणे यांना दिली असल्याने ते अपघातस्थळी आले होते.

Latest news
Related news