Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यांचा ताफा अडविण्यासाठी निघालेल्या तृप्ती देसाई पुणे पोलिसांच्या ताब्यात

शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या असताना सहकारनगर पोलिसांकडून कारवाई

एमपीसी न्यूज- सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना आज सकाळी सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एका उदघाटन समारंभासाठी शिर्डीमध्ये येणार आहेत. त्यावेळी शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात तृप्ती देसाई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची होती. त्यासाठी शिर्डी येथे नरेंद्र मोदी यांचा ताफा अडविण्याचा इशारा त्यांनी दिला होता. तृप्ती देसाई या शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या असताना सहकारनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.