Pune : धावत्या बसमध्ये घुसून कंडक्टरला लुटण्याचा प्रयत्न; गुंडाची दादागिरी सिसिटीव्हीत कैद

एमपीसी न्यूज – शनिपार-नीलज्योती (मार्ग क्रमांक 59) दरम्यान पीएमपी बसमध्ये घुसून गुंडगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी सहाच्या सुमारास निळज्योती थांब्यावर हा प्रकार घडला.

दोन युवकांनी बसमध्ये प्रवेश करत वाहक कैलास रणदिवे यांना मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला. रणदिवे आणि चालक महादेव शिंदे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे हल्लेखोर दोन्ही युवक पळून गेले. हा प्रकार बसमधील सीसीटीव्हीत कैद झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like