Pune : ‘तुळशीबागे’सह महात्मा फुले भाजी मंडई लवकरच होणार सुरू

Tulshibagh Market - Mahatma Phule Vegetable Market will start soon

एमपीसी न्यूज – पुणेकरांची महत्वपूर्ण असणारी तुळशीबाग बाजारपेठ आणि महात्मा फुले भाजी मंडई लवकरच सुरू होणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अतिरीक्त आयुक्त शांतनू गोयल व इतर अधिकारी सोमवारी किंवा मंगळवारी संबंधित परिसराची पाहणी करणार आहेत. त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड हे दोन्ही भाग सुरू करण्यासाठी आदेश काढणार आहेत.

तुळशीबागेतील दुकाने अल्टरनेट पद्धतीने सुरू करण्यावर विचार सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गर्दी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, या ठिकाणी दुकाने सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आराखडा तयार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर करून आता अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यामुळे या भागातील विक्रेत्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी कोरोना नसलेल्या भागांत 12 तास व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे.

लक्ष्मी रोडवरील दुकानेही सुरू झाली आहेत. त्यामुळे तुळशीबाग बाजारपेठ आणि मंडई सुरू करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. यासाठी तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनचे सचिव नितीन पंडीत यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

तर, व्यवसाय बंद ठेऊन मागील अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आता झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य विक्रेत्यांना जगणे अवघड झाले आहे. या परिस्थितीत तुळशीबाग बाजारपेठ आणि महात्मा फुले भाजी मंडई सुरू होणे गरजेचे असल्याचे सभागृह नेते धीरज घाटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like