Pune: चोवीस तासांत दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात रुग्णांची संख्या 15 ने वाढली

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे रुग्ण काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. हा आकडा आता 282 वर गेला असून आणखी रुग्णांची संख्या 15 ने वाढली.आहे. दिवसभरात ससून रुग्णालयातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुणे शहरात 237, पिंपरी – चिंचवडमध्ये 31 तर, ग्रामीण भागात 12 असे 282 कोरोनाचे रुग्ण आहेत. आजमितीस डॉ. नायडू रुग्णालयात 153 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

दिवसभरात ससून रुग्णालयातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मागील 24 तासात पुण्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 15 ने वाढली. दाटीवाटीने असलेल्या भवानी पेठ आणि कसबा मतदारसंघात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.