Pune : एकविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन 21 डिसेंबर रोजी

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे, भगवान महावीर शिक्षण संस्था, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवारी (दि. २१) आणि रविवारी (दि. २२ डिसेंबर) एकविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आणि प्रा. प्रकाश पगारिया व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रीतम-प्रकाश महाविद्यालय, इंद्रायणीनगर, भोसरी येथे हे संमेलन होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अशोककुमार पगारिया यांची तर, उद्योजक कृष्णकुमार गोयल स्वागताध्यक्षपदी निवड केली आहे़ संमेलनाचे उदघाटन २१ तारखेला सकाळी १० वाजता माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी नवी दिल्ली येथील ऑल इंडिया श्वेतांबर स्थानाक जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष पारस मोदी, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष बबनराव भेगडे, संघटक डॉ. विजय ताम्हाणे आदी उपस्थित राहणार आहेत. तर संमेलनाचा समारोप रविवारी (दि. 22) 4.30 वाजता होणार असल्याचेही रोकडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.