Pune : तल्याठ्याकडून काम करवून घेण्यासाठी 50 हजारांची लाच मागणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – अर्जावर वाघोली येथील तलाठ्याच्या सह्या घेण्यासाठी नागरिकांना 50 हजार रुपयांची (Pune)लाच मागितल्या प्रकरणी दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. ही कारवाई 11 ते 12 मे दरम्यान करण्यात आली होती. गुन्ह्याची पडताळणी करून 6 जून रोजी दोघांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भाऊसाहेब भिकाजी गिरी (वय 56, रा. आव्हाळवाडी, वाघोली, जि. पुणे) आणि संजय मारूती लाड (वय 53, रा. साईनगर, लोहगाव, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी वाघोली तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावर मदतनीस भाऊसाहेब गिरी आणि संजय लगड यांनी तलाठी पटांगे यांच्याकडून काम करून देण्यासाठी 50 हजार रूपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती.

Pune : भरधाव वेगातील ट्रकची दुचाकीला धडक; तरुणीचा जागीच मृत्यू

या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपींनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस (Pune) उपअधीक्षक माधुरी भोसले पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.