Pune: जुन्नर परिसरात वानराची शिकार करून मित्रांसोबत पार्टी, दोघांना अटक

Pune: Two arrested for hunting monkeys common langur in Junnar area आसवले आणि हिलम या दोघांनी वानराचा पाठलाग करुन गलोलच्या सहाय्याने मारले. त्यानंतर आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर वानराच्या मांसाचे तुकडे आपापसात वाटून पार्टी केली.

एमपीसी न्यूज- जुन्नर तालुक्यातील धालेवाडी (मिन्हेर) येथे वानराची शिकार करुन मित्रांसोबत पार्टी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. भारतीय वन्यजीव अधिनियमानुसार वन्यप्राण्याची शिकार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ गोपाळ आसवले (29, रा. फुलवडे, ता. आंबेगाव, जि. पुणे) गणपत शिमगे हिलम (40, रा. धालेवाडे तर्फे मिन्हेर, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आसवले आणि हिलम या दोघांनी वानराचा पाठलाग करुन गलोलच्या सहाय्याने मारले. त्यानंतर आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर वानराच्या मांसाचे तुकडे आपापसात वाटून पार्टी केली.

ही माहिती समजल्यानंतर वन्य विभागाने त्यांना ताब्यात घेतले. वानराची शिकार केल्यास 3 वर्षे कैद व 25 हजार रुपये दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे.

या दोघांना गुरुवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) विवेक खांडेकर, जुन्नरचे उपवनसंरक्षक आर जयरामेगौडा, सहा वनसंरक्षक डी वाय भुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.