Pune : शिवाजीनगर भागात पादचाऱ्याला कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर भागात पादचाऱ्याला कोयत्याच्या ( Pune ) धाकाने लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत.

चंदू नंदू सरोदे (वय 19) आणि सिद्धेश विश्‍वास शेंडगे (वय 18 , दोघे रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोदे, शेंडगे आणि अल्पवयीन साथीदारांनी शिवाजीनगर भागातून पहाटे निघालेल्या पादचाऱ्याला अडवून कोयत्याचा धाक दाखविला होता.

Pune : मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पादचाऱ्याकडील मोबाईल चोरून ते पसार झाले होते. पोलिसांनी पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार सरोदे आणि शेंडगे यांना सापळा लावून महापालिका भवन परिसरातून ताब्यात घेण्यात आले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अजित बडे, अविनाश भिवरे, राजकिरण पवार, रूपेश वाघमारे, सुदाम तायडे यांनी ही कारवाई ( Pune ) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.