Pune : होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज- शुक्रवारी पुण्यात झालेल्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यापैके एकजण रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे, तर दुसरा रेल्वेमध्ये लोहार म्हणून काम करतो.

संजय सिंग आणि पांडुरंग वनारे अशी या दोघांची नावं आहेत. संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे, तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमध्ये लोहार म्हणून काम करतो. हे दोघे होर्डिंग काढण्याचे काम करत होते. मात्र होर्डिंग वरुन कापण्याऐवजी त्यांनी खालून कापण्यास सुरुवात केली होती. सीसी टीव्ही होर्डिंग पडताना होर्डिंगखाली असलेली व्यक्ती उठून पळताना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली व्यक्ती पांडुरंग वनारे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.