HB_TOPHP_A_

Pune : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी आणखी दोघांना अटक

83

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला प्रकरणी सायबर गुन्हे शाखेकडून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद आणि नांदेड येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १८ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांनी दिले.

HB_POST_INPOST_R_A

शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय 28, रा. मिर्झा कॉलनी, औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय 22, रा. धावरीतांडा, नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात यापूर्वी फहिम मेहफुज शेख (वय 27, रा. नुरानी कॉम्प्लेक्स, भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय 30, रा. आझादनगर, औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: