Pune : खडकवासला कालव्यात आढळ्ले दोन मृतदेह

एमपीसी न्यूज – पुण्यातील नांदेड फाटा ते धायरी फाटा या दरम्यान असणाऱ्या खडकवासला कालव्यात दोन मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह अग्निशमन केंद्राच्या जवानांनी बाहेर काढले आहेत. मात्र, त्यांची ओळख पटली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.. तरुणीचे वय 25 ते 30 तर तरुण 30 ते 32 वयाचा असण्याची शक्यता आहे. तरुणाच्या डोक्यावर पोहण्यासाठी वापरण्यात येणारी कॅप घातलेली आहे व हाफ पॅन्ट असल्याने हे दोघे पोहण्यासाठी पॅनलमध्ये उतरले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.