Pune : तरुण बेपत्ता असल्याच्या एकाच दिवशी दोन तक्रारी दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यात एकाच दिवशी दोन तरुण बेपत्ता असल्याच्या दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पहिली तक्रार फरासखाना पोलीस ठाणा येथे नोंदवण्यात आली आहे. तर दुसरी तक्रार खडक पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

आकाश मसोटे (वय 25, रा. कसबा पेठ, पुणे) व अक्षय आवार (वय 23, रा. शुक्रवार पेठ, पुणे मूळ सोलापूर), अशी या दोन्ही बेपत्ता तरुणांची नावे आहेत. या दोघांची बेपत्ता असल्याची तक्रार दि. 24 एप्रिलला नोंदवण्यात आली आहे.

  • आकाश हा 22 एप्रिलला दुपारच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला असून याविषयी त्याची आई उर्मिला मसोटे हिने फरासखाना पोलीस ठाण्यात 24 एप्रिलला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली आहे. आकाश हा रंगाने सावळा असून अंगाने सडपातळ आहे. उंची 5.6 फूट आहे. नाक सरळ, चेहरा उभट, उजवे हाताचे पोटरीवर आकाश तर मानेवर ओम असे लिहिले आहे. छातीवर डाव्या बाजूस नक्षी काढलेले आहे. अंगात निळ्या रंगाचा हाफ टी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पायात ग्रे रंगाचा बूट असा वेश परिधान केला आहे.

तर अक्षय आवार हा मनोज धुमपट्टी येथे शिलाईच्या कारखान्यात काम करीत होता. तो दि. 22 एप्रिल रोजी पगार घेऊन कारखान्यातून निघाल्यानंतर पुन्हा घरी परतला नाही. त्यामुळे बेपत्ता असल्याची तक्रार दि. 24 एप्रिलला नोंदवण्यात आली. अक्षय हा रंगाने गोरा असून उंची अंदाजे 5 फूट आहे. केस वाढलेले चेहरा उभट, नाक सरळ, कान बारीक आहेत. त्याने निळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पँट, पायात गोल्डन रंगाची चप्पल घातलेली आहे.

या दोघांबद्दल कोणत्याही स्वरुपाची माहिती मिळाल्यास पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like