Pune : पुण्यात आणखी दोन ‘कोरोना बळी’

एमपीसी न्यूज : पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, बळींची संख्याही वाढत आहे. या आजाराने आज आणखी 2 जणांचा ससूनमध्ये   बळी गेला आहे. मृत दोघेही गंजपेठ आणि कोंढाव्यातील रहिवासी होते.  दरम्यान, पुण्यात आतापर्यंत एकूण ४६ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या बळींमध्ये वाढ होत असल्याचे पुणेकरांची चिंताही वाढत आहे.

ससूनमध्ये उपचार घेत असलेला पहिला रुग्ण आज बरा होणार होता. मात्र, कोरोनामुळे आणखी 2 बळी गेल्याने ससूनमध्ये बळी जाणाऱ्यांची संख्या काही कमी व्हायला तयार नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 2 नागरिकांना डायबेटीसचाही आजार होता, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

वाकडेवाडी येथील ६५ वर्षीय कोरिनाबाधित महिलेचा बुधवारी रात्री उशिरा मृत्यू झाला आहे. संबंधित महिलेवर ३ एप्रिलपासून ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना हायपरटेन्शनचाही त्रास होता. तर, त्या 65 वर्षीय महिलेला ब्लडप्रेशरचाही त्रास होता. त्यांच्या शरीरातील वेगवेगळे अवायव निकामी झाले होते, अशी माहिती ससून रुग्णालयातर्फे देण्यात आली.

सर्वाधिक क्रिटिकल असणारे रुग्ण ससूनमध्ये उपचारासाठी दाखल होतात. आतापर्यंत शहरात 46 जणांचा मृत्यू झाला असून, ससूनमध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत. इतर उपचार बाकी रुग्णालयात करण्यात येतात. पुण्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणूनअर्ध्या पुण्याचा भाग सील करण्यात आला आहे. संचारबंदी ही लागू केली तरीही काही उत्साही पुणेकरांचे बाहेर फिरणे काही कमी झाले नाही. शा नागरिकांवर पोलिसांनी कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.