Pune : कोर्टात आलेल्या मित्रांना भेटू न दिल्यामुळे आरोपींची पोलिसाशी हुज्जत

एमपीसी न्यूज- कोर्टात आलेल्या मित्रांना भेटू न दिल्यामुळे आरोपींनी पोलिसाशी हुज्जत घातली. ही घटना काल बुधवारी (दि.9) दुपारी सव्वादोनच्या सुमारास लष्कर न्यायालयाच्या आवारात घडली.

मोहसीन अब्बास शेख (वय 22) आणि मुजमील ऊर्फ मुज्जू मजित खान (वय 23) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एस.एस.खुटवड यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहसीन आणि मुजमील या दोघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तारखेच्या सुनावणीसाठी फिर्यादी खुटवड आणि त्यांचे सहकारी त्यांना काल दुपारी लष्कर न्यायालयात घेऊन गेले. दरम्यान आरोपींना कोर्टात भेटायला आलेल्या आरोपींच्या मित्रांना भेटू न दिल्यामुळे दोघा आरोपींनी अपशब्द वापरत फिर्यादी खुटवड यांच्याशी झटापट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

याप्रकरणी त्या दोघांवर लष्कर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.