Pune : दिवसभरात आज ‘कोरोना’मुळे दोघांचा मृत्यू;, तर, मृतांचा आकडा 26 वर

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही चिंताजनक अशीच आहे. शुक्रवारी आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रोगामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 26 झाली आहे. पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण भवानी पेठेत आहेत. या भागात 40 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.

आज पुणे जिल्ह्यात ३६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून २५० च्या जवळपास पोहोचली आहे. पुणे शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना करोनाची लागण झाली होती. त्या सर्वांचा 14 दिवसांचा आयसोलेशनचा काळ संपला. त्यांची दोनदा चाचणी करून रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यांनतर आज या कुटुंबाला घरी सोडण्यात आले. एकूण २३ जण करोनामुक्त झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.