BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दिंडीमध्ये जेसीबी घुसून दोघांचा मृत्यू; भाजपकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

एमपीसी न्यूज- दिंडीमध्ये जेसीबी घुसून दोघांचा मृत्यू झाला. यातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची भाजपकडून मदत जाहीर केली.

संत नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूर येथून आळंदीला जात असताना ब्रेक फेल झालेला जेसीबी पालखी सोहळ्यात घुसून नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला तर, या घटनेत 17 वारकरी जखमी झाले. ही घटना आज सकाळी दिवे घाटातील तिसऱ्या वळणावर घडली.

यातील जखमींचा उपचार खर्चही भाजपकडून केला जाईल..सध्या राज्यात सरकार नसल्यामुळे भाजपकडून मदत जाहीर करू शकतो..या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले तर, सोळा जणांना उपचार करून सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले..सरकार आल्यानंतर वारकऱ्यांना पोलीस संरक्षणाची मागणीचा विचार करणार असल्याचेही सांगितले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3