_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune : परदेशातील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषाने दोन लाखांची फसवणूक

Two lakh fraud in the lure of a well-paid job abroad

एमपीसीन्यूज : परदेशात चांगल्या प्रकारची नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका तरुणाची दोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी धायरीतील एका 42 वर्षे तरुणाने तक्रार दिली. त्यानुसार शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. जून महिन्यात त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आला.

_MPC_DIR_MPU_II

फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना बेल्जियम देशामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपीने दाखवलेल्या आमिषाला फिर्यादी बळी पडले.

त्यानंतर आरोपीने डॉक्युमेंटेशन आणि इतर कारणासाठी एक लाख 92 हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात भरण्यास सांगितले.

फिर्यादी यांनीही हे पैसे जमा केले. मात्र, नोकरी मिळत नसलं;नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. या नंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलीस निरीक्षक संतोष बर्गे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.