Pune : पुण्यात कोरोनाबाधित आणखी दोघांचा मृत्यू!; तर एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या 18

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना या रोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. आज बुधवारी रात्री 9च्या पुढे कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

बुधवारी कोरोनामुळे तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्यांची एकूण संख्या आता 18 झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनो सावधानता बाळगा, आणि प्रशासनास सहकार्य करा, असेही आवाहन वेळोवेळी केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.