Pune: ‘कोविड’मुळे पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू; मृत रुग्णांची एकूण संख्या 33

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोंढवा येथे रहिवाशी असलेल्या 50 वर्षीय महिलेचा आज दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 9 एप्रिलला त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला आधीपासूनच वेगवेगळे आजार होते. त्यात ‘कोरोना’चीही लागण झाली होती. याशिवाय रविवारी मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनामुळे मृत्युमुखी झालेल्याची संख्या 33 वर पोहोचली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.