Pune : फसवणूक करून लुबाडणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक

एमपीसी न्यूज- फसवणूक करून लुबाडणा-या रेकाॅर्डवरील गुन्हेगारांना शिक्रापुर परिसरामधून अटक करून पाच लाख नऊ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

अब्बास सैफुददीन उकानी, उर्फ दत्तात्रय सोनु शिंदे (वय 44, रा.वसई ईस्ट गोखिंडगाव जानकीपारा जि. पालघर ) मुकेश परमेश्वर मेमन( वय 54, रा.वसई ईस्ट गोखिंडगाव जानकीपारा जि. पालघर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर 2018 सकाळी पावणे दहाच्या दरम्यान शिक्रापुर येथे फिर्यादी हे अॅक्सीस बॅंकेमधुन दोन लाख रूपये घेऊन जात होते. त्यावेळी बॅकेत बसलेल्या अनोळखी आरोपीने पाठीमागून येऊन फिर्यादीस, बॅंक आॅफ महाराष्ट्र शाखेचा चेक देऊन तुमच्या मालकाने मला पैसे देण्यासाठी सांगितले आहे,असे सांगुन रक्कम नेली. या प्रकरणी शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अशाच प्रकारचा गुन्हा एका अनोळखी आरोपीने 5 नोव्हेंबरला केला होता.

एल.सी.बी. टिमने अशा प्रकारचे गुन्हे औरंगाबाद, नाशिक, सांगली व पुणे शहरामध्ये केल्याबाबत सी.सी.टि.व्ही. फुटेज वरून माहिती संकलीत केली आणि गुन्हयांचा तांत्रिक स्वरूपाने तपास केला. एल.सी.बी. टिमला अब्बास आणि मुकेश हे दोघे अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकाॅर्डवरील आरोपी असल्याची माहिती मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमला खबऱ्याकडून मिळालेल्या बातमीनुसार अब्बास आणि मुकेश हे दोघेजण त्यांच्या स्काॅर्पीओ गाडीसह येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे या दोघांना शिक्रापुर परिसरामध्ये ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून स्काॅर्पीओ गाडीसह गुन्हयामधील ऐंशी हजारांची रोकड व मोबाईल फोन असा एकूण पाच लाख नऊ हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.

आरोपींवर यापुर्वी गुजरात राज्यासह वीस गुन्हे दाखल असून, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, प.बंगाल, हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यामधे देखील गुन्हे केले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.