Pune: भोसरीतून दोन अट्टल दरोडेखोर अटकेत; साडे दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Pune: Two robbers arrested from Bhosari; Ten and a half lakh items seized रवीसिंग कल्याणी हा पाच घरफोड्यातील आणि दरोड्याच्या तयारीतील गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. त्याच्यावर यापूर्वी 31 घरफोड्या आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

एमपीसी न्यूज- भोसरी येथील फुलेवाडी येथे दोन अट्टल घरफोड्यांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना बेड्या ठोकल्या. यापूर्वी या दोघांनीही 60 हून अधिक घरफोड्या केल्या असून एका प्रकरणात ते फरार होते. त्यांच्या ताब्यातून चार चाकी गाड्या, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण साडे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. रवीसिंग कल्याणी आणि युवराज मोहिते अशी या घरफोड्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही फुगेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्या दोघांनाही जेरबंद केले. या दोघांनीही आपल्या साथीदारांच्या मदतीने पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दत्तवाडी, स्वारगेट, कोथरूड या भागात साठहून अधिक घरफोड्या केल्याचे समोर आले आहे.

रवीसिंग कल्याणी हा पाच घरफोड्यातील आणि दरोड्याच्या तयारीतील गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. त्याच्यावर यापूर्वी 31 घरफोड्या आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

त्याने तिलकसिंग टाक या आपल्या साथीदारासह दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी केल्याचेही निष्पन्न झाले आहे. तिलकसिंग टाक याच्याविरोधात घरफोडी, वाहनचोरी, शस्त्र बाळगणे यासारखी 35 हून अधिक गुन्ह्याची नोंद आहे.

दुसरा रुपेश मोहिते हा कराड पोलीस स्टेशन हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याने मित्र अभिजीत तुळशीदास पवार याचा सत्तूरने वार करून खून केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like