Pune : दहावीला पुणे विभागात दोघांना 35 टक्के!; धनकवडीतील श्रावण साळुंके आणि मरकळमधून विनायक लोखंडे हे विद्यार्थी झाले पास

त्यांच्या 'अवघड' कामगिरीचीच सर्वत्र चर्चा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. 8) जाहीर करण्यात आला. यंदाही विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 8) दुपारी एक वाजता ऑनलाईनद्वारे निकाल पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. यंदा पुणे विभागातून दोघांना 35 टक्के गुण मिळाले आहेत. धनकवडीतील श्रावण राजेश साळुंके आणि मरकळमधून विनायक अशोक लोखंडे अशी पास झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि  कोकण या नऊ विभागातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल एकाच वेळी जाहीर करण्यात आला. यंदाही www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org आणि www.maharashtraeducation.com संकेतस्थळांवरून निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

  • यावेळी 90 टक्के, 95 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे सर्वत्र कौतुकही होत आहे. पण, पुणे विभागात पुण्यात धनकवडीतील श्रावण राजेश साळुंके आणि मरकळमधून विनायक अशोक लोखंडे या दोन  विद्यार्थ्यांचेही तितकेच कौतुक होत आहे. या दोंघांनाही सर्व विषयात 35 गुण मिळवले आहेत. या निकालानंतर त्याच्या नावाची एकदम चर्चा सुरू आहे. यातील श्रावण राजेश साळुंके हा पुण्यातील धनकवडी परिसरातील रहिवाशी असून तो रोहन माध्यमिक विद्यालयाचा तो विद्यार्थी आहे.

सर्वच विषयात 100 गुण मिळवणे जितकं अवघड तितकंच काहीसे सर्व विषयात 35 गुण मिळवणे अवघड समजले जाते. पण, पुण्यातील या दोघांनी हे अवघड दिव्य पार पडलंय. त्यांच्या या ‘अवघड’ कामगिरीचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.